पीडित बिल्किस बानो यांना ५० लाख रुपये, घर, नोकरी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

वर्ष २००२ ची गुजरात दंगल

गोध्रा हत्याकांडातील किती जणांना इतकी हानीभरपाई मिळाली आहे ? किंवा धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्‍या आक्रमणात हानी झालेल्या हिंदूंना कधी अशी भरपाई मिळाली आहे का ?

नवी देहली – गुजरातमध्ये गोध्रा येथील कारसेवकांच्या हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीतील पीडित बिल्किस बानो यांना हानीभरपाई म्हणून ५० लाख रुपये, तसेच घर आणि सरकारी नोकरी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी गुजरात सरकारने बिल्किस बानो यांना हानीभरपाई म्हणून ५ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता; मात्र तो फेटाळून लावण्यात आला. या दंगलीत बिल्किस बानो यांच्या मुलीची हत्या झाली होती, तसेच त्यांच्या कुटुंबातील १४ जणांचा मृत्यू झाला होता.

न्यायालय म्हणाले की, आम्ही गुजरात सरकारच्या विरोधात कोणतीही टिप्पणी करत नाही, हे गुजरात सरकारने स्वतःचे भाग्य समजावे.


Multi Language |Offline reading | PDF