गोमांसबंदी, नद्यांची स्वच्छता अशी सूत्रे निवडणुकीच्या प्रचारात हवीत ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

भोपाळ – भारतातून गोमांसाची निर्यात कधी बंद होणार ?, नोटाबंदीमुळे झालेली हानी कशी भरून काढणार ?, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्येची समस्या कशी सोडवणार ?, गंगा-नर्मदा या नद्यांची स्वच्छता कधी होणार ? आदी निवडणुकीच्या प्रचारासाठी महत्त्वाची सूत्रे असायला हवीत; मात्र काही व्यक्ती मर्यादा सोडून वक्तव्ये करतात आणि मूळ समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करतात, असे द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले. ‘स्वच्छ मनाने, निर्मळ हृदयाने आणि भक्तीभावाने रहाणार्‍या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात’, असेही शंकराचार्य म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF