जे.जे. रुग्णालयातील १८ टक्के व्हेंटिलेटर्स निकामी

मुंबईसारख्या विकसित शहरात आरोग्य सुविधांची दयनीय स्थिती राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद !


मुंबई – शहरातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा असतांना देशभरातून उपचारासाठी येत असलेल्या येथील प्रसिद्ध जे.जे. रुग्णालयातील ८३ पैकी १५ व्हेंटिलेटर्स निकामी आहेत. चेतन कोठारी या माहिती अधिकार कार्यकत्याने माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मिळवली आहे.

कोठारी यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार निकामी व्हेंटिलेर्समध्ये एका जपानी आस्थापनाने वर्ष २००४ मध्ये दिलेल्या व्हेंटिलेटर्सचाही समावेश आहे. विशेष म्हणजे निकामी असलेल्यांपैकी काही व्हेंटिलेटर्स अतीदक्षता विभागातील आहेत. अशा प्रकारे मुंबईमधील अनेक रुग्णालयांतील असंख्य व्हेंटिलेटरर्स निकामी आहेत. ‘शहरातील रुग्णालयांतील अतीदक्षता विभागात पुरेशा खाटा आहेत का, त्या चांगल्या स्थितीत आहेत का, हे जाणून घेण्यासाठी ही माहिती मागवण्यात आली होती’, असे कोठारी यांनी सांगितलेे. याविषयी राज्य मानवी हक्क आयोगापुढे सुनावणी चालू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now