(म्हणे) ‘लिखित तक्रार आल्यास साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील अत्याचारांची चौकशी होऊ शकते !’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना अटक केल्यानंतर भाजप त्यांच्या पाठीशी ठामपणे का उभा राहिला नाही ? भाजपने ४ वर्षांत साध्वींवरील अत्याचाराविषयी कधी काही भाष्य केले नाही. निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर मात्र ते होत आहे, हे जनतेच्या लक्षात येते ! 
  • साध्वी प्रज्ञासिंह यांना छळणार्‍यांपैकी एक असणारे परमबीर सिंह यांना महाराष्ट्रातील भाजप सरकारने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस महासंचालक का बनवले ? त्यांची चौकशी करून त्यांच्यावर इतक्या वर्षांत कारवाई का केली नाही ?

मुंबई – साध्वी प्रज्ञासिंह यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांच्या संदर्भात कोणी लिखित स्वरूपात तक्रार प्रविष्ट केल्यास निश्‍चित या प्रकरणाची नव्याने चौकशी होऊ शकते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ एप्रिल या दिवशी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. ‘साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर झालेल्या अत्याचाराची धारिका (फाईल) तुम्ही नव्याने खोलणार का ?’, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.

विविध प्रश्‍नांची उत्तरे देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,

१. देशातील हिंदूंची अपकीर्ती करण्याचा डाव आखल्यास, हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्यास, तसा ‘नॅरेटीव्ह’ (कथा) सिद्ध केल्यास त्यांना उत्तर द्यावेच लागेल. हिंदूंना आतंकवादी बनवण्याची संहिता (स्क्रीप्ट) कोणी लिहीत असेल, तर त्यास उत्तर मिळणारच आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी हिंदु संस्कृतीविरुद्ध डाव आखणार्‍यांना हे उत्तर दिले आहेे.

२. हुतात्मा हेमंत करकरे यांच्याविषयी साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेले वक्तव्य (करकरे यांना शाप दिल्यामुळे ते ठार झाले, अशा आशयाचे केलेले विधान) चुकीचे आहे.

३. वर्ष २००८ च्या प्रतिज्ञापत्रामध्ये साध्वी प्रज्ञासिंह यांनी त्यांच्यावरील अत्याचाराच्या (टॉर्चरच्या) संदर्भात लिहिले होते. मग आताच तुम्ही साध्वी प्रज्ञा, साध्वी प्रज्ञा, असे का करत आहात ?


Multi Language |Offline reading | PDF