नाशिक जिल्ह्यात दारणा नदीतील पाण्याची चोरी रोखण्यासाठी शस्त्रधारी लष्करी सैनिक तैनात !

येत्या काळात अशी स्थिती येईल, हे आम्ही पूर्वीच सांगितले होते. आगामी काळात पाण्यासाठी लोक एकमेकांचे जीवही घेण्यास मागेपुढे पहाणार नाहीत. येणार्‍या भयावह आपत्काळाला तोंड देण्यासाठी भावभक्ती वाढवून ईश्‍वराची आराधना करा !

नाशिक – जिल्ह्यात दारणा नदीतील पाण्याची चोरी रोखण्यासाठी शस्त्रधारी लष्करी सैनिक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील काही परिसरात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत आहे. लहवित, भगूर, देवळाली कॅम्प, नाशिक रोड, चेहेडी ते सिन्नर आदी भागांत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करता पिण्यासाठी पंधरा दिवस पुरेल इतके पाणी जलसंपदा विभागाने दारणा धरणातून सोडले; परंतु नदीच्या परिसरातील काही शेतकरी रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे दादागिरी करून शेतीसाठी मोटारीने नदीतून पाणीउपसा करत असल्याचे लक्षात आले.


Multi Language |Offline reading | PDF