पंतप्रधान मोदी १ मे या दिवशी अयोध्येला प्रचारासाठी जाणार

निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी अयोध्येला जाणार आहेत; मात्र त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून एकदाही अयोध्येला भेट दिली नाही किंवा रामललाचे दर्शन घेतले नाही, हे हिंदू जाणून आहेत !

अयोध्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी १ मे या दिवशी अयोध्येला जाणार आहेत. या दिवशी आंबेडकरनगर आणि अयोध्या या दोघांच्या मध्ये असलेल्या गोसाईगंजच्या मया बाजार परिसरात आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलणार आहेत. अयोध्येतील मंदिरांमध्ये मोदी पूजा-अर्चा करणार का?, याविषयी माहिती मिळू शकलेली नाही.  पंतप्रधान बनल्यापासून गेल्या ५ वर्षांत ते एकदाही अयोध्येला गेेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या या दौर्‍याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे. या मतदारसंघात ६ मे या दिवशी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF