पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांनी दिलेले अबीर लावल्यावर एस्.एस्.आर्.एफ्.च्या जर्मनीतील साधिका कु. पेट्रा स्टिच यांना आलेल्या अनुभूती

कु. पेट्रा स्टिच

ऑगस्ट २०१८ मध्ये होणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेसाठी मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्या वेळी पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांनी सर्व साधकांसाठी अबीर दिले होते. कार्यशाळेतील एका सत्रात आम्हाला ते लावण्यासाठी दिले. नंतर मी ते माझ्या अनाहत चक्रस्थानी लावले.

१. त्या वेळी माझ्या पायांना सूज आल्यामुळे ते पुष्कळ दुखत होते. अबीर लावल्यानंतर काही वेळाने माझ्या पायांतील वेदना न्यून झाल्या.

२. त्या वेळी मला माझ्या देहाचे अस्तित्वही जाणवत नव्हते.

३. वास्तविक अबीर लावण्याच्या १ घंटा आधी माझे मन नकारात्मक स्थितीत होते; पण अबीर लावल्यावर माझे मन उत्साही झाले आणि मला सकारात्मक वाटू लागले. संतांचे आशीर्वाद असलेले अबीर लावल्यामुळे माझ्या मनाची स्थिती पूर्णतः पालटली.

४. मला माझ्या उजव्या हातावर एक दैवी कणही आढळला.’

– कु. पेट्रा स्टिच, जर्मनी (५.८.२०१८)

दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF