नामांकित आस्थापनांच्या नावे बोगस माल विकणार्‍या व्यापार्‍यांना ५ कोटींचा दंड

मुंबई – नामांकित आस्थापनांच्या नावे विदेशात निकृष्ट दर्जाचा माल विकणार्‍या व्यापार्‍यांना फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. किशोर जैन, जितेंद्र बुराड आणि हरीश बुराड अशी या कळंबोली स्टील मार्केटमधील व्यापार्‍यांची नावे आहेत. दंडाची ही रक्कम टाटा कर्करोग रुग्णालयात दान करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या व्यापार्‍यांनी सौदी अरबस्तानातील मे. यान्बू स्टील आस्थापनाला लागणारे सीमलेस कार्बन स्टील पाइप हे ‘निप्पॉन स्टील’ आस्थापनाने सिद्ध केले आहेत, असे भासवून त्यांची विक्री केली होती. हे पाईप खराब झाल्याने वरील आस्थापनाने तक्रार केल्यावर हा घोटाळा उघडकीस आला.


Multi Language |Offline reading | PDF