हुगली, बंगाल येथे सार्वजनिक दुर्गापूजन कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री. शंभू गवारे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना अधिवक्ता जयदीप मुखर्जी

हुगली (बंगाल) – येथील ‘ऑल इंडिया लिगल एड् फोरम’चे सरचिटणीस तथा प्रवक्ते अधिवक्ता जयदीप मुखर्जी यांच्या निवासस्थानी सार्वजनिक दुर्गापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभात त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर राज्यांचे समन्वयक श्री. शंभू गवारे यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात रामकृष्ण मिशन, प्रजापति ब्रह्मकुमारी संप्रदाय, श्री चैतन्य सारस्वत मठाचे प्रमुख आणि बंगालच्या प्रसिद्ध कलाकार श्रीमती सावित्रीदेवी चट्टोपाध्याय उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी माता अन्नपूर्णादेवीची पूजा केली.


Multi Language |Offline reading | PDF