श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारे शुल्क त्वरित रहित करा !-हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे मागणी

उजवीकडून पहिले निवासी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ

सिंधुदुर्ग -श्री माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुंफेजवळ प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी आरती करण्यात येते.या आरतीमध्ये देशभरातील अनेक भक्त सहभागी होतात.आरतीमध्ये सहभागी होणासाठी प्रत्येक भक्तांकडून श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड १ सहस्र रुपये शुल्क आतापर्यंत आकारत होते,तो दर आता २ सहस्र रुपये असणार आहे,अशी घोषणा बोर्डाने नुकतीच केली आहे.हा निर्णय म्हणजे जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर मर्यादा आणण्याचा प्रकार आहे आणि तो अत्यंत संतापजनक आहे.अशा प्रकारे अन्य गोष्टींमध्ये आर्थिक लुटमार होत असल्यास त्यांची सखोल चौकशी करून ती तात्काळ थांबवण्याचा आदेश देण्यात यावा,तसेच याविषयी आपल्याकडून झालेल्या कार्यवाहीविषयी कृपया आम्हाला अवगत करावे,अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रपतींकडे केली आहे.याविषयीचे राष्ट्रपतींना देण्याचे निवेदन येथील निवासी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने नुकतेच दिले आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१.आरतीसाठी पैसे आकारणे आणि आता असलेल्या आरतीसाठीच्या पैशांत दरवाढ होणे,हे सर्वसामान्य हिंदू अन् देवीभक्त यांना न परवडणारे आहे.अशा प्रकारे दरवाढ करून एकप्रकारे श्रीमंतांनाच आरती आणि दर्शनाचा लाभ मिळवून देऊन गरीब भक्तांना धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र आहे,असे कोणाला वाटल्यास त्यात चूक काय ?

२.श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाकडे वैष्णोदेवीच्या भक्तांनी अर्पण केलेला निधी कोट्यवधी रुपयांमध्ये असतांना बोर्ड हिंदूंकडून अशा प्रकारे पैसा गोळा करून एकप्रकारे हिंदु भाविकांची लूट करत आहे.

३.आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे मागणे म्हणजे देव आणि भक्त यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचे महापाप आहे.एखाद्याकडे पैसे नसल्यास त्याने आरतीमध्ये सहभागी होऊ नये का ?कोणी स्वेच्छेने स्वतःहून पैसे देत असेल,तर ते घेणे ठीक आहे;पण त्यासाठी भक्तांची अडवणूक करून आरतीसाठी पैशाची मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे.त्यामुळे आरतीसाठी आधीची एक सहस्र रुपयांची अन्यायकारक अट रहित करण्याची आवश्यकता आहे.

४.नुकताच प्रयाग (उत्तरप्रदेश)येथे कुंभमेळा झाला.कुंभमेळ्यासाठी रेल्वेने येणार्‍या भाविकांवर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त अधिभार लावण्याचा निर्णय घेतला होता;पण हिंदूंनी केलेल्या विरोधामुळे ही दरवाढ मागे घेण्यात आली.

५.एकीकडे शासन हज यात्रेकरूंना सवलत आणि त्यांना विशेष वैद्यकीय सुविधा देते,तर दुसरीकडे हिंदु यात्रेकरूंवर मात्र निर्बंध घालते.हिंदूंच्या कोणत्याच यात्रांना शासन कसलीच सवलत देत नाही.उलट यात्रेवर विविध कारणे दाखवून कर लादले जात आहेत.धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणार्‍या या शासनप्रणालीत सर्व धर्मांना समान न्याय मिळणे अपेक्षित असतांना हिंदूंच्या संदर्भात तसे कोठेच होतांना दिसत नाही.

६.सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू असल्याने तेथील राज्यपाल तथा केंद्र सरकार यांनी आरतीच्या माध्यमातून हिंदूंना होत असलेला भुर्दंड रोखावा आणि देवीभक्तांना आरती विनामूल्य करण्यास अनुमती द्यावी.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष गावडे,जगन्नाथ केरकर,सुरेश दाभोलकर,डॉ.सूर्यकांत बालम,डॉ.अशोक महिंद्रे आणि सनातनचे श्री.गजानन मुंज उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF