साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखे धर्मनिष्ठ संसदेमध्ये असल्यावर देवता आणि संत यांचा अवमान करण्याची कोणी हिंमत करणार नाही ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

मुंबई – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखे धर्मनिष्ठ संसदेत असल्यावर हिंदु देवता आणि संत यांचा अवमान करण्याची कोणी हिंमत करणार नाही. लोकशाहीच्या नावाखाली हिंदु धर्माचे दमन आणि अन्य धर्मियांना सुविधा या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेची देण आहेत. हे थांबवण्यासाठीच साध्वी प्रज्ञासिंह यांना आम्ही पाठिंबा देत आहोत, असे राष्ट्रीय वारकरी परिषदेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. हिंदु धर्माचा अवमान न होण्यासाठी, भारतात हिंदूंना गुलाम बनवण्याचे कारस्थान हाणून पाडावे यासाठी धर्मांतरबंदी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा सिद्ध करणे आवश्यक आहे.

२. या भारतात अन्य कोणत्याही धर्माला विशेष सवलती देऊ नये, यासारख्या सूत्रासाठी आपण नेहमी विविध पक्ष अथवा नेते यांच्याकडे मागणी करत असतो.

३. अंतःकरणात देवावर श्रद्धा, साधू आणि संत यांचा आदर अन् हिंदु धर्मावर नितांत प्रेम या सर्व गोष्टींसाठी कारागृह भोगलेली अशी व्यक्ती म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह आहेत.

४. त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या सारख्या विचारांच्या लोकांकडेच आता देशाची सत्ता असावी. त्यामध्ये राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक सत्ता, तसेच प्रशासकीय व्यवस्थेतही अधिकाधिक अधिकारी हे देव, संत आणि हिंदु धर्म यांवर श्रद्धा असणारे हवेत, अशी भावना ह.भ.प. गुरुवर्य पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी व्यक्त केलेली आहे.

५. साध्वी प्रज्ञासिंह यांचा ज्याप्रमाणे छळ करण्यात आला, तो अमानवीय होता; मात्र स्त्रियांना मातेसमान मानणार्‍या संतांच्या शिकवणीला पायदळी तुडवण्याचा हा प्रकार झाला. तथाकथित मानवाधिकार, स्त्रीमुक्तीवाले गप्प राहिले आहेत.

६. ‘नाही भीड भाड !’ या संत वचनाप्रमाणे आम्ही वारकरी म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. पोलीस आणि प्रशासन हिंदुत्वनिष्ठ लोकांना जाणूनबुजून त्रास देतात, याची कितीतरी उदाहरणे आहेत. आतंकवाद्यांना संरक्षण आणि हिंदुत्वनिष्ठांचे दमन हे पूर्वीपासून चालूच आहे.

७. आज साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर केवळ आरोप झाल्याने त्यांच्यावर टीका करणारे; मात्र आतंकवादी याकूब मेमन याच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर फाशी रहित करण्यासाठी रात्रीचे न्यायालय उघडायला लावणारे हिंदुद्वेषी नेते हिंदु जनतेला वेडे समजत आहेत.

८. एखाद्या आतंकवाद्याची फाशी रहित करण्यासाठी रात्रीचे न्यायालय उघडणे म्हणजे या देशात येणार्‍या काळात भयंकर उपद्रवी शक्ती कार्य करत आहेत, हे सिद्ध होत आहेत.

९. त्यासाठी हिंदूंनी सर्व मतभेद दूर ठेवावेत, तसेच विश्‍वाच्या पाठीवर हिंदूंसाठी हिंदूंचा एक सुरक्षित असा देश हवा, ही इच्छा मनात ठेवून भगवंताला प्रार्थना करा आणि कर्तव्य म्हणून साध्वी प्रज्ञासिंह यांना संसदेत पाठवा.


Multi Language |Offline reading | PDF