नृत्यातील हात कमळाप्रमाणे करण्याची मुद्रा करताच साधकाच्या हातावर दैवी कण येणे

श्री. राम होनप

‘४.३.२०१८ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने रामनाथी आश्रमात एका संगीत-कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मध्यंतर चालू असतांना नृत्याशी संबंधित काही साधिका नृत्यातील ‘पद्ममुद्रे’चा सराव करत होत्या. या मुद्रेत दोन्ही हातांचा कमळाप्रमाणे आकार सिद्ध होतो.

हा सराव पाहून मलाही त्याप्रमाणे मुद्रा करावीशी वाटली; म्हणून मी माझे दोन्ही हात कमळाच्या आकाराप्रमाणे केले, तेव्हा माझ्या उजव्या हाताच्या पोकळीत सोनेरी रंगाचा एक दैवी कण आला. त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आला, ‘लक्ष्मीदेवीचा वास सात्त्विक कमळात असतो. त्याप्रमाणे हातांची मुद्रा सात्त्विक कमळाप्रमाणे करताच हातावर देवाचा, म्हणजे दैवी कणाचा वास आला आहे.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF