‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सरकारकडूनच लिंगभेद ?

मुंबई – राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेसाठी ‘मी नसेन दिवा वंशाचा, मी आहे वात, नाव चालवेन कुळाचे…’ अशा आशयाचे विज्ञापन करण्यात आले आहे. त्यात ‘मुलगा हा वंशाचा दिवा असतो’, असे सुचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आक्षेप घेऊन नगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी राज्य कुटुंब कल्याण कार्यालयात तक्रार केली आहे.

मुलगा-मुलगी असा भेद करणे कायद्याने गुन्हा असला, तरी राज्य सरकारच असा लिंगभेद करत असल्याचा दावा बोर्‍हाडे यांनी केला आहे. ‘हे विज्ञापन प्रसिद्ध करणारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित मंत्री या सर्वांवर गर्भधारणापूर्व लिंगनिवडीस प्रतिबंध कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी बोर्‍हाडे यांनी न्यायालयात केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF