‘शब-ए-बारात’ कालावधीत वांद्रे येथे जलद वाहन चालवणार्‍या ४ धर्मांधांवर गुन्हे

१३ जणांवर कारवाई

गुन्हेगार प्रवृत्तीचे धर्मांध !

मुंबई – मुसलमानांच्या ‘शब-ए-बारात’ला २० एप्रिलच्या रात्री रिक्शा चालवतांना ‘स्टंटबाजी’ करणार्‍या समीम मुमताज अहमद शेख या धर्मांध युवकाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. या रात्री ‘धूम स्टाईल’ने गाड्या चालवणार्‍या आणखी ४ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून १३ जणांवर कारवाई करून ११ जणांच्या दुचाकी कह्यात घेतल्या आहेत. समीम हा खेरवाडी जंक्शनजवळ रात्री अडीच वाजता नागमोडी वळणे घेत एका टायरवर रिक्शा चालवत होता. पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.

पोलिसांनी त्याच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ‘शब-ए-बारात’च्या कालावधीत वांद्रे सी लिंक परिसरात मुसलमान युवक अशा प्रकारे स्टंटबाजी करतात. त्यामुळे अन्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, हे लक्षात घेऊन पोलिसांनी या कालावधीत या परिसरात पहारा ठेवला होता.


Multi Language |Offline reading | PDF