न्यूझीलंडच्या मशिदींमधील गोळीबाराचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेतील चर्चमध्ये बॉम्बस्फोट

इस्लामिक स्टेटने बॉम्बस्फोटांचे दायित्व स्वीकारले

  • भारतात गेली ३ दशके जिहादी आतंकवादी आक्रमण करत आहेत. अनेक मंदिरांमध्ये त्यांनी आक्रमण करून अनेक हिंदूंना ठार केले, तर काश्मीरमधील अनेक मंदिरांची तोडफोड केली. तेथील मशिदींवरील भोंग्यांवरून धमक्या देऊन साडेचार लाख हिंदूंना पळवून लावले, तरी हिंदू शांत राहिले. त्यांनी एकदाही त्याचा सूड घेतला नाही; मात्र धर्मांध त्यांच्या मशिदीमध्ये झालेल्या एका गोळीबाराचा दुसर्‍या देशात काही दिवसांत सूड घेतात, यातून ‘कोण असहिष्णु आहे’, हे लक्षात येते !
  • हिंदूंनी त्यांच्यावरील आक्रमणांचा असा सूड घेतला असता, तर देशात एकही धर्मांध शिल्लक राहिला नसता; मात्र हिंदूंनी तसे केेले नाही, हे पुरो(अधो)गामी जाणतील का ? आणि आतातरी ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे सांगतील का ?

कोलंबो – येथे २२ एप्रिल या ख्रिस्त्यांच्या ‘ईस्टर संडे’च्या पवित्र दिवशी झालेले बॉम्बस्फोट हे न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथे १५ मार्च या दिवशी एका ख्रिस्त्याने केलेल्या २ मशिदींवरील गोळीबाराचा सूड घेण्यासाठी करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या संरक्षण खात्याचे राज्यमंत्री रुवान विजयवर्धने यांनी संसदेत दिली आहे. तसेच या स्फोटांचे दायित्व इस्लामिक स्टेटने स्वीकारले आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत ३२१ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४५० जण घायाळ झाले आहेत. मृतांमध्ये ८ भारतियांचा समावेश आहे.

Sri Lanka bomb attacks were revenge for New Zealand mosque killings: Minister

मशिदींमध्ये गोळीबार करणार्‍या रॅटन्ट याने ‘मुसलमानांचा पृथ्वीवरून समूळ नायनाट करण्यासाठी मी हे कृत्य केले’, असे म्हटले होते. यामुळेच चर्चमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून स्फोट करण्यात आले.

आक्रमणाची माहिती असतांनाही चर्चचे संरक्षण करणे अशक्य होते ! – श्रीलंकेचे संरक्षण सचिव

कोलंबो – देशात इतके मोठे आक्रमण होईल, याची सरकारला कल्पना नव्हती. गुप्तचरांनी माहिती देऊनही सर्व चर्चचे रक्षण करणे अशक्य होते, असे श्रीलंकेचे संरक्षण खात्याचे सचिव हेमासिरी फर्नेंडो यांनी म्हटले आहे.

१. स्थानिक वृत्तपत्र ‘संडे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत फर्नेंडो यांनी म्हटले की, गुप्तचर विभागाने सांगितले होते की, एक लहान मात्र शक्तीशाली गुन्हेगारी गट देशात कार्यरत आहे. या बॉम्बस्फोटांची एफ्बीआयद्वारे चौकशी चालू आहे, तर इंटरपोल आता चौकशी करणार आहे.

२. फर्नेंडो पुढे म्हणाले की, आम्ही यापुढेही हॉटेल्सना सुरक्षा देणार नाही. त्यांनी स्वतःच त्यांचे संरक्षण करावे. यापूर्वीही यादवीच्या वेळीही आम्ही अशी सुरक्षा दिली नव्हती.


Multi Language |Offline reading | PDF