मुसलमानांकडे धर्माच्या आधारे मत मागणारे काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर ३ दिवस प्रचार करण्यावर बंदी

निवडणूक आयोगाची हास्यास्पद कारवाई

हिंदु धर्माच्या आधारावर मते मागितली म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ६ वर्षे मतदान न करण्याची आणि निवडणूक न लढवण्याची बंदी घातली जाते; मात्र मुसलमानांकडे धर्माच्या आधारे मते मागणार्‍यांना केवळ ३ दिवस प्रचार करण्यास बंदी घातली जाते, हे लक्षात घ्या !

नवी देहली – निवडणूक आयोगाने काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर ७२ घंटे प्रचार करण्यावर बंदी घातली आहे. सिद्धू यांनी बिहारमधील कटिहार येथे मुसलमानांना मतांचे विभाजन होऊ न देता संघटित होऊन महाआघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले होते.


Multi Language |Offline reading | PDF