आतापर्यंत १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा माल जप्त –  अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे

निरर्थक आणि अपयशी लोकशाहीचे उदाहरण !

मुंबई – महाराष्ट्रात आचारसंहितेच्या कालावधीत पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभाग आदी विभागांकडून काटेकोर कार्यवाही चालू आहे. या विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, मद्य, मादक पदार्थ, सोने-चांदी आदी स्वरूपात १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

राज्यात आचारसंहिता भंग आणि निवडणूक प्रक्रियेशी निगडित अन्य स्वरूपाचे २२ सहस्र ७९५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यात अनधिकृतरित्या मद्य बाळगणे, त्याची विक्री, मद्याची वाहतूक, अनधिकृतरित्या शस्त्रनिर्मिती, त्याची विक्री, त्याचे प्रदर्शन, शस्त्र जवळ बाळगणे, नशेचे पदार्थ बाळगणे, मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. आतापर्यंत या संदर्भात ३ सहस्र ५६१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यातील २ सहस्र ३४ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now