केवळ गरिबी आणि बेरोजगारीच नव्हे, तर भगवान राम अन् राष्ट्रवाद हीसुद्धा महत्त्वपूर्ण सूत्रे ! – योगऋषि रामदेवबाबा

देहराडून – हे अयोग्य आहे की, देशात केवळ गरिबी आणि बेरोजगारी हेच निवडणुकीतील मुख्य सूत्रे आहेत. भगवान श्रीराम आणि राष्ट्रवाद हेही तितेकच महत्त्वपूर्ण सूत्रे आहे, असे प्रतिपादन योगऋषि रामदेवबाबा यांनी केले.

१. साध्वी प्रज्ञासिंह यांचे समर्थन करतांना योगऋषि रामदेवबाबा पुढे म्हणाले की, साध्वी प्रज्ञासिंह यांना ९ वर्षे कारागृहात रहाण्यास बाध्य व्हावे लागले. त्या जर अयोग्य गोष्ट करत असतील, तर तुम्ही त्यांना रोखू शकता; मात्र केवळ संशयावरून कोणाला कारागृहात टाकणे आणि त्यांच्यावर अत्याचार करणे अयोग्य आहे.

२. योगऋषि रामदेवबाबा पुढे म्हणाले की, देश वर्तमान स्थितीत आर्थिक, धार्मिक, राजकीय आदी प्रकारच्या आव्हानांचा सामना करत आहे. या आव्हानांना पार करून देश वर्ष २०२० पर्यंत जगाचे नेतृत्व करील.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now