(म्हणे) ‘ईव्हीएम्’मध्ये फेरफार हाच खरा चिंतेचा विषय आहे !’ – शरद पवार

भाजपकडे लोकांचा कल दिसू लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली, असे म्हणायचे का ? उद्या भाजपला अधिक मते मिळाल्यास विरोधक कसा गदारोळ करतील, याची ही झलकच नव्हे का ?

मुंबई – नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेतून जावे, ही जनभावना असली तरी ‘ईव्हीएम्’मध्ये फेरफार हाच खरा चिंतेचा विषय आहे. मी अनेक मतदारसंघांत फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधी आहे; पण ईव्हीएम् हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो किंवा ‘ईव्हीएम्’मध्ये गडबड केली जाऊ शकते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार म्हणाले. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह संयुक्त महाआघाडीच्या नेत्यांनी २३ एप्रिल या दिवशी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

‘ईव्हीएम्’वर कुठूनही नियंत्रण ठेवले जाऊ शकते. रशियन हॅकर कोट्यवधी रुपयांच्या बदल्यात ईव्हीएम् हॅक करतात, असा दावा या पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू यांनी केला.


Multi Language |Offline reading | PDF