राहुल गांधी यांचे उत्तर समाधानकारक नसल्याने सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

‘चौकीदार चोर आहे’, या विधानाचे प्रकरण

नवी देहली – ‘मी चौकीदार आहे’ संदर्भातील विधानावर राहुल गांधी यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली  आहे. याचे उत्तर ३० एप्रिलपर्यंत मागवण्यात आले आहे.

राफेल विमान खरेदी प्रकरणातील निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका स्वीकारल्यावर याचा निवडणुकीच्या प्रचारात उल्लेख करतांना राहुल गांधी यांनी, ‘संपूर्ण देश म्हणतो आहे की, चौकीदार चोर आहे. आज आनंदाचा दिवस आहे की सर्वोच्च न्यायालयाने देखील असेच म्हटले आहे’, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी केली होती. त्यावर गांधी यांच्याकडून न्यायालयाने उत्तर मागितली होते. उत्तर देतांना राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केेला होता; मात्र न्यायालयाने हे उत्तर समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF