‘जरो किलो प्रतिष्ठान नेपाल’च्या कार्यकर्त्यांसाठी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेे यांचे हिंदु राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन

१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेे, २. डॉ. नर्मलमणी अधिकारी, ३. श्री. गुरुराज प्रभु, ४. कु. सानु थापा आणि ‘जरो किलो प्रतिष्ठान नेपाल’चे कार्यकर्ते

काठमांडू – १२.४.२०१९ या दिवशी येथील ‘जरो किलो प्रतिष्ठान नेपाल’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. निर्मलमणी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. नर्मलमणी अधिकारी म्हणाले, ‘‘आज काही हिंदु घोषणाबाजी करतात. त्यातील काहींच्या मनात संवेदना आहेत; पण हिंदु धर्माचे ज्ञान नाही. जसे गंगेला अवतरित करतांना भगिरथाने तिच्यासाठी मार्ग बनवला, तसे हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर ते चालवण्यासाठी योग्य पिढीची आवश्यकता आहे आणि हे कार्य सनातन संस्था करत आहे. सनातन आश्रमात जाण्याचा योग आला, त्या वेळी मी हे स्वतः अनुभवले आहे. अनेक संघटना आणि लोक हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी येतात; मात्र त्यांचा हेतू शुद्ध नसतो. काहीतरी राजकीय लाभ साधण्याचा त्यांचा हेतू असल्याचे लक्षात येते. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे धर्मबंधूंविषयी असलेल्या प्रेमामुळे ते आम्हाला साहाय्य करण्यासाठी येत असल्याचे मी स्वतः अनुभवले आहे.’’

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळेे म्हणाले, ‘‘समाजावर शब्दांचा प्रभाव होत नाही, तर वाणीतील चैतन्याचा प्रभाव होत असतो, असे आपल्या धर्मात सांगितले आहे. हिंदु संघटनाच्या कार्यात युवकांचा सहभाग होण्यासाठी त्यांच्यामध्ये धर्माभिमान जागृत केला पाहिजे. जोपर्यंत जनता आणि राज्यकर्ते या दोघांना जोडणारी व्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यंत खरे हिंदु राष्ट्र येणार नाही. प्रजेला आणि राजाला दोघांनाही स्वतःच्या दायित्वाची जाणीव हिंदु राष्ट्रात असेल.’’ या  वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुराज प्रभु आणि फोरम फॉर हिंदु अवेकनिंकच्या सदस्या कु. सानु थापा उपस्थित होत्या.


Multi Language |Offline reading | PDF