काठमांडू येथे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा ‘विश्‍व ज्योतिष महासंघा’च्या वतीने ‘धर्मालंकार’ पुरस्कार देऊन सन्मान

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा ‘धर्मालंकार’पुरस्कार देऊन सन्मान करतांना २. नेपाळ सरकारच्या पंचांग नियामक समितीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र गौतम, ३. ‘विश्‍व ज्योतिष महासंघा’चे अध्यक्ष डॉ. लोकराज पौडेल आणि अन्य मान्यवर.

काठमांडू – येथे १२.४.२०१९ या दिवशी ‘विश्‍व ज्योतिष महासंघा’चा २४ वा वार्षिकोत्सव पार पडला. या वेळी ‘विश्‍व ज्योतिष महासंघा’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना ते आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी निःस्वार्थी अन् अविरतपणे करत असलेल्या हिंदु संघटनाच्या कार्यासाठी ‘धर्मालंकार’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी नेपाळ सरकारच्या पंचांग नियामक समितीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र गौतम आणि ‘विश्‍व ज्योतिष महासंघा’चे अध्यक्ष डॉ. लोकराज पौडेल यांच्यासह नेपाळ, भारत, जपान आणि अमेरिका येथील प्रतिनिधी उपस्थित होते. ज्योतिष हे वेदाचे सहावे अंग आहे आणि हे ज्योतिषशास्त्र जगभरात पोचवण्याचे उल्लेखनीय कार्य करत असल्याविषयी सद्गुरु (डॉ.) पिंगळेे यांनी ‘विश्‍व ज्योतिष महासंघा’चे कौतुक केले.


Multi Language |Offline reading | PDF