सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची काठमांडू येथील निर्माणाधीन दशमहाविद्या सिद्धपीठातील ॐ आश्रमाचे स्वामी कमलयोगी यांच्याशी भेट

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

काठमांडू – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळच्या दौर्‍यात १०.४.२०१९ या दिवशी काठमांडू येथील बुढानीलकंठ येथील निर्माणाधीन दशमहाविद्या सिद्धपीठातील ॐ आश्रमाचे स्वामी कमलयोगी यांची भेट घेतली. या वेळी स्वामी कमलयोगी यांनी तंत्रसाधनेविषयीचे सर्व ग्रंथ ‘डिजीटल’ स्वरूपात संग्रहित केल्याचे आणि आध्यात्मिक क्षेत्रात वैज्ञानिक पद्धतीने शोधकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी स्वामी कमलयोगी यांना असे संशोधकार्य गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत असल्याचे सांगितले. या वेळी स्वामी कमलयोगी यांनी सनातन आश्रमविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना परात्पर गुरु डॉ. जयंंत आठवले यांचा जीवन परिचय करून दिला आणि सनातन आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले. स्वामी कमलयोगी म्हणाले, ‘‘जर कुणालाही तंत्रविद्येचा अभ्यास करायचा असेल, तर मला केव्हाही सांगावे. मी सहकार्य करण्यासाठी सदैव सिद्ध आहे.’’ दशमहाविद्येविषयी आम्ही केलेले शोधकार्य व्यर्थ जाऊ नये आणि ही विद्या लोप पावू नये, यासाठी एखाद्या अधिकारी व्यक्तीला हे शोधकार्य सुपुर्द करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.’’

 


Multi Language |Offline reading | PDF