संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक !

अशा वासनांधांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

संभाजीनगर – एम्आयएम् पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेला नगरसेवक धर्मांध सय्यद मतीन याला बलात्काराच्या गुन्ह्यात सिटीचौक पोलिसांनी १९ एप्रिल या दिवशी अटक केली. महिलेला नोकरी देण्याचे, तसेच विवाहाचे आमीष दाखवत बलात्कार केल्याप्रकरणी १५ जानेवारी या दिवशी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात ! – संपादक)

१. रशीदपुरा येथील एक महिला आधारकार्ड बनवण्यासाठी १ वर्षापूर्वी धर्मांध मतीन याच्या कार्यालयात गेली होती. या वेळी मतीन याने तिला आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता.

२. यानंतर धर्मांध मतीन याने विवाहास नकार दिल्यानंतर या महिलेने पोलिसात धाव घेतली.

३. धर्मांध मतीन याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन संमत न केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.


Multi Language |Offline reading | PDF