नाशिक येथे तडीपार गुंडाचा धारदार शस्त्राने पोलीस अधिकार्‍यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न

तडीपारी ही शिक्षाच मुळात हास्यास्पद आहे. जागा पालटून गुंडाची गुंडगिरी कशी अल्प होईल ? तडीपारीची शिक्षा म्हणजे गुंडाला दुसर्‍या ठिकाणी गुन्हे करण्याची मोकळीक देणे. असे असल्याने अशा घटना घडल्या तर नवल ते काय ?

नाशिक – पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात चालू असलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’च्या काळात पोलीस अधिकार्‍यावर तडीपार गुंडाने धारदार शस्त्राने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. गणेश उपाख्य बाला भास्कर कालेकर हा शस्त्राचा धाक दाखवून गोदाकाठावर दहशत माजवण्याच्या प्रयत्नात होता. हे कळताच पोलीस तिथे आले. त्यास पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळेस पोलिसांनी त्याला अटक केली. या आरोपीचा हत्या, हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत समावेश असल्याचे समजते.


Multi Language |Offline reading | PDF