पदभरती करण्यात विद्यापिठे दिरंगाई करत असल्याने शासनाने ३३८ कोटी ६० लक्ष रुपये थकवले !

पदभरती न करणारी विद्यापिठे ही त्यांच्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन करतात !

मुंबई – शासनाकडून १९९५ पासून विद्यापिठाला ३३८ कोटी ६० लक्ष १० सहस्र ५३१ रुपये येणे आहे; मात्र विद्यापिठाकडूनच भरतीला अनुमती घेण्यात दिरंगाई करण्यात आल्यामुळे शासनाने वेतन थकवले आहे. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी आणि वेतनातील फरकाची ही रक्कम आहे. (अशी विद्यापिठे विद्यार्थ्यांना कसे शिक्षण देत असतील याचा विचार न केलेला बरा ! – संपादक)

विद्यापिठातील शासन अनुदानित १ सहस्र ६८४ पदांपैकी ९४७ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत; मात्र तरीही विद्यापिठाच्या निधीवरील वेतनाचा भार वर्षागणिक वाढत गेला आहे. २०१६ ते फेब्रुवारी २०१९ या ३ वर्षांतील थकबाकी १११ कोटी आहे. काही पदांवर झालेल्या भरतीविषयीही आक्षेप घेण्यात आले आहेत. बिंदू नामावली न करणे, शासनाची आवश्यक अनुमती न घेता पदभरती करणे असे विद्यापिठांकडून होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF