(म्हणे) ‘भारताने ‘दिवाळी’साठी अणूबॉम्ब ठेवले नाहीत, तसे पाकनेही ते‘ईद’साठी ठेवलेले नाहीत!’

मेहबूबा मुफ्ती यांची देशद्रोही विधाने चालूच

  • पाकच्या प्रवक्त्यांप्रमाणे बोलणार्‍या मेहबूबा मुफ्ती ! पाकचा निःपात करण्याआधी त्याची तळी उचलणार्‍या अशा नेत्यांना सरकारने प्रथम वठणीवर आणावे !
  • अशी विधाने करणार्‍या मेहबूबा मुफ्ती, तसेच ओमर अब्दुल्ला, फारूख अब्दुल्ला यांना कारागृहात डांबण्याचे धाडस भाजप करणार नाही, हे लक्षात घ्या ! उलट ‘त्यांनी अशी विधाने केल्यावर स्वतःची ‘राष्ट्रवादी’ प्रतिमा उंचावून मते मिळवता येतील’, असाच भाजपचा विचार असणार, असेच जनतेला वाटते !

श्रीनगर – भारताने दिवाळीसाठी अणूबॉम्ब ठेवले नाहीत, तसेच पाकनेही ईदसाठी ते ठेवलेले नाहीत, असे विधान पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानच्या बाडमेर येथील प्रचारसभेत, ‘भारताने पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरण्याचे धोरण सोडून दिले आहे. प्रतिदिन पाक भारताला अणूबॉम्बच्या आक्रमणाची धमकी देत होता. आम्हीही आमच्याजवळ असणारे अणूबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेे आहेत का?’, असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now