श्रीलंकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी

बॉम्बस्फोटांमधील मृतांचा आकडा २९०

कोलंबो – येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांतील मृतांचा आकडा २९० वर पोचला आहे, तर ५०० जण घायाळ झाले आहेत. मृतांमध्ये ३२ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून यात ब्रिटन, अमेरिका, तुर्कस्तान, भारत, चीन, पोर्तुगाल आणि अन्य २ देश यांच्या नागरिकांचा समावेश आहे. बॉम्बस्फोटांनंतर लागू करण्यात आलेली संचारबंदी सरकारने मागे घेतली असली, तरी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी २२ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू होणार असल्याचे घोषित केले आहे. श्रीलंका सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने सामाजिक माध्यमांवर बंदी घातली आहे.

राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना

स्फोटांनंतर मशिदीवर पेट्रोलबॉम्बने आक्रमण

कोलंबोतील बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेतील पश्‍चिम भागात मशिदीवर पेट्रोलबॉम्ब फेकण्यात आले, तर एका मुसलमान व्यक्तीच्या २ दुकानांवर आक्रमण करण्यात आले.

कोलंबो विमानतळावर पाईप बॉम्ब, तर बसस्थानकावर ८७ डिटोनेटर सापडले

कोलंबो – येथे झालेल्या ८ बॉम्बस्फोटांनंतर येथील मुख्य विमानतळाजवळही एक पाईप बॉम्ब आढळून आला. तो निष्क्रीय करण्यात आल्याने धोका टळला. तसेच येथील बसस्थानकावर ८७ डिटोनेटर सापडले आहेत. श्रीलंकेच्या वायूदलाचे प्रवक्ते ग्रुप कॅप्टन गिहान सेनेविरत्ने यांनी दावा केला की, साखळी बॉम्बस्फोटांत वापरण्यात आलेले ‘आयईडी’ हे स्थानिक ठिकाणीच बनवण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF