‘नॅशनल तौहीद जमात’कडूनच श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट

श्रीलंका सरकारकडून अधिकृत घोषणा

जिहादी आतंकवाद्यांनी आता श्रीलंकेलाही आणि त्यातही ख्रिस्त्यांना लक्ष्य केले आहे. यापूर्वी लिट्टेला आतंकवादी ठरवून तिचा निःपात करतांना ३५ सहस्र निरपराध हिंदूंचे हत्याकांड करणारी श्रीलंका जिहाद्यांच्या विरोधात काय करणार आहे, हे पहावे लागेल !

कोलंबो – श्रीलंकेत झालेले ८ साखळी बॉम्बस्फोट स्थानिक जिहादी संघटना ‘नॅशनल तौहीद जमात’कडून करण्यात आले आहेत. स्फोट घडवणारे सर्व आत्मघाती आतंकवादी श्रीलंकेचेच नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे श्रीलंकेचे आरोग्यमंत्री राजीथा सेनारत्ने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

श्रीलंकेचे पोलीस या आक्रमणाचे अन्वेषण करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत सुमारे २४ लोकांना अटक करण्यात आली आहे. ‘नॅशनल तौहीद जमात या आतंकवादी संघटनेला बाहेरील देशांमधून साहाय्य मिळाले आहे का ?, याचे अन्वेषण चालू आहे’, असे सेनारत्ने यांनी म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now