हेमंत करकरे यांचा अपमान केला नाही ! – साध्वी प्रज्ञासिंह यांचे निवडणूक आयोगाच्या नोटिसीला उत्तर

भोपाळ – मी माझ्या भाषणात कोणत्याही हुतात्म्याच्या मृत्यूविषयी आक्षेपार्ह विधान केलेले नाही. माझ्या भाषणाची केवळ एकच ओळ न पहाता संपूर्ण भाषण पाहिले पाहिजे. यामध्ये मी तत्कालीन काँग्रेस सरकारकडून मला देण्यात आलेल्या यातनांचा उल्लेख केला होता. माझ्यासमवेत त्या वेळी जे झाले ते जनतेसमोर ठेवणे हा माझा अधिकार आहे. माझ्या वक्तव्याला माध्यमांनी मोडून-तोडून सादर केले आहे.

जनभावनेचा सन्मान करतांना मी माझे विधान मागे घेतले होते. आचारसंहितेचे उल्लंघन होईल असे कुठलेही कृत्य मी केलेले नाही किंवा भाषणही दिलेले नाही, असे उत्तर साध्वी प्रज्ञासिंह यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. काही दिवसांपूर्वी ‘मी शाप दिल्यामुळेच आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा अंत झाला’, अशा आशयाचे विधान केले होते. त्यावरून निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञासिंह यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली होती.


Multi Language |Offline reading | PDF