(म्हणे) ‘२३ मे या दिवशी मोदी यांना फासावर लटकवणार !’ – काँग्रेसचे उमेदवार लालजीत राठिया

लालजीत राठिया

जशपूरनगर (छत्तीसगड) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २३ मे या दिवशी  फासावर लटकवणार, असे विधान छत्तीसगडमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार लालजीत राठिया यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी एका प्रचारसभेत ते बोलत होते. (अशी विधाने करणार्‍यांवर पोलीस तात्काळ कारवाई करून त्यांना अटक का करत नाहीत ? छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे हुकुमशाही आहे का ? उद्या भाजपवाल्यांनी काँग्रेसच्या नेत्यांविषयी असेच म्हटले, तर काँग्रेसवाले काय बोलणार आहेत ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF