डहाणू आणि नेरूळ येथे संकटमोचन हनुमंताला साकडे !

श्री सद्गुरु गजानन महाराज मंदिरात साकडे घालतांना धर्मप्रेमी

मुंबई, २२ एप्रिल (वार्ता.) – कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या प्रभु श्रीरामाच्या अयोध्येतील मंदिर उभारणीतील सर्व प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी श्रीरामाच्या परम्भक्त हनुमंताला साकडे घालण्यात आले. हनुमान जयंतीच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथील श्री सद्गुरु गजानन महाराज मंदिर आणि नवी मुंबईतील नेरूळ येथील पुरातन दंड मारुति श्री जागृत हनुमान मंदिर येथे साकडे घालण्यात आले.

पुरातन दंड मारुति श्री जागृत हनुमान मंदिरात साकडे घालतांना धर्मप्रेमी

या वेळी उपस्थित भाविकांनी श्रीरामाचे एकत्रित भावपूर्ण नामस्मरण आणि प्रार्थना केली. डहाणू येथे श्री. पंडित चव्हाण यांनी साकडे वाचून दाखवले. तर नेरूळ येथे दोन्ही ठिकाणी मिळून ११० भाविक आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

अयोध्येत श्रीराम मंदिराचे निर्माण त्वरित करावे, अशी मागणी करणारी पत्रे ३७ धर्मप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयाला लिहून पाठवली.

सद्गुरु गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष श्री. गणेश गुराडा, उपाध्यक्ष श्री. महेंद्र कडू, तसेच मंदिर समितीच्या सदस्य यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. पुरातन दंड मारुति श्री जागृत हनुमान मंदिराचे विश्‍वस्त सर्वश्री मनोज ईसवे आणि कांबळी यांनीही या उपक्रमास सहकार्य केले. सनातनच्या साधिका सौ. प्रविणा पाटील यांनी या मंदिरात साकडे वाचून दाखवले.


Multi Language |Offline reading | PDF