यवतमाळ जिल्ह्यामध्ये ‘नामसंकीर्तन अभियाना’द्वारे मारुतिरायाला साकडे !

साकडे घालतांना धर्मप्रेमी आणि साधक

यवतमाळ, २२ एप्रिल (वार्ता.) – हिंदु राष्ट्राची म्हणजेच रामराज्याची स्थापना लवकर व्हावी, अयोध्या येथील राममंदिर स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घ आयुरारोग्य लाभावे, यासाठी हनुमान जयंतीनिमित्त यवतमाळ, वणी, नेर, कारंजा, दारव्हा येथील ७ मंदिरांमध्ये १९ एप्रिलला सकाळी ९ ते १० या वेळेमध्ये प्रभु श्रीरामाचा सामूहिक नामजप करून मारुतिरायाला साकडे घालण्यात आले. यामध्ये ९१ धर्मप्रेमी आणि सनातनचे साधक सहभागी झाले होते.

विशेष :

१. उज्ज्वलनगर, यवतमाळ येथील मंदिरात लहान मुलेही नामजपामध्ये सहभागी झाली होती.

२. कारंजा येथील श्रीवनवेश्‍वर मंदिरात १२ धर्मप्रेमींनी ‘राममंदिर उभारणीसाठी प्रार्थना करू’, असे सांगितले.

३. दारव्हा येथील ५ धर्मप्रेमींनी ‘श्रीरामाचा नामजप केल्याने आनंद मिळाला’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.


Multi Language |Offline reading | PDF