राममंदिराच्या उभारणीसाठी जळगाव जिल्ह्यात पत्रलेखन आणि सामूहिक नामजप !

जळगाव, २२ एप्रिल (वार्ता.) – राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चांदसणी-कमळगाव, यावल, साकळी, तसेच जळगाव शहरातील अवचित हनुमान मंदिरात सामूहिक पत्रलेखन करण्यात आले. यात बालक ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्याचप्रमाणे जळगाव शहरातील अवचित हनुमान मंदिर येथे आणि चोपडा शहराच्या अलकरीवाडा, बारीवाडा, घरकुल परिसर येथे धर्मप्रेमींच्या वतीने ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. ‘हे प्रभु श्रीरामा, हे श्री हनुमंता, राममंदिराची उभारणी अन् देशात रामराज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी तूच कृपा कर. या प्रक्रियेमध्ये येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर कर’, अशी प्रार्थनाही या वेळी करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF