(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांना रोखा, नाहीतर निवडणुकीत हानी होईल !’ – शिया मौलाना कल्बे जवाद यांची मोदी यांना चेतावणी

ही चेतावणी नसून थेट धमकीच आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! निवडणुकीत हानी होईल; म्हणून हिंदुत्वाची सूत्रे भाजपने गेल्या ५ वर्षांत पूर्ण केलेली नाहीत आणि आता त्याचा फटका बसत असल्याने भाजपकडून हिंदुत्वाचे सूत्र पुन्हा हातात घेण्यात आले आहे. त्यामुळे धर्मांधांचा तिळपापड होत असल्याने ते अशी विधाने करत आहेत !

नवी देहली – साध्वी प्रज्ञासिंह यांनी ‘बाबरी मशीद पाडली आता राममंदिरही बांधू’ अशा केलेल्या विधानावर शिया मौलाना कल्बे जवाद यांनी मोदी यांना चेतावणी दिली आहे. ‘काही लहान नेते देशातील वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. जर त्यांच्याकडून अशी विधाने होत राहिली, तर पंतप्रधान मोदी यांना निवडणुकीत हानी होईल.’

मौलाना पुढे म्हणाले की, वर्ष २०१४ मध्ये विकासाच्या सूत्रावर मोदी निवडून आले होते. तेव्हा मंदिर किंवा मशीद यांचे सूत्र नव्हते. जर भाजप मंदिर-मशीद सूत्रावर जोर देत असेल, तर जनता त्याला नाकारील, असेच आम्हाला वाटते.


Multi Language |Offline reading | PDF