आतंकवादी कारवायांसाठी भाग्यनगर (हैद्राबाद) सुरक्षित ठिकाण ! – बंडारू दत्तात्रेय

भाग्यनगर – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) भाग्यनगरमध्ये नुकत्याच केलेल्या कारवाईवरून हे सिद्ध होते की, भाग्यनगर हे इस्लामी आतंकवादी कारवायांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. येथे इस्लामी आतंकवाद्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आतंकवादी कारवायांसाठी मोठ्या प्रमाणावर तरुणांची भरती येथूनच करण्यात आली आहे, असे विधान भाजपचे खासदार बंडारू दत्तात्रेय यांनी केले. नुकतेच एन्आयएने इस्लामिक स्टेटशी संबंधित तिघांना भाग्यनगरमधून कह्यात घेतले होते. यावर दत्तात्रेय यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, तेलंगण राष्ट्र समिती सरकारने एम्आयएम्शी येथे युती केल्याने या ठिकाणी पोलिसांवरही ठोस कारवाई करतांना बंधने येत आहेत. त्यामुळे या प्रकरणी योग्य कारवाई व्हावी, तसेच अशा कारवायांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथक नेमावे, अशी मागणीही त्यांनी केली.


Multi Language |Offline reading | PDF