प्रवरा परिसरात विखे-पाटील कुटुंबियांची हिटलरशाही चालते ! – डॉ. अशोक विखे-पाटील यांचा आरोप

नगर – प्रवरा परिसरात विखे-पाटील कुटुंबियांची हिटलरशाही चालते. त्यांच्या शिफारशीविना कोणतेही काम होत नाही. त्यांनी सख्ख्या भावाला एवढा त्रास दिला आहे, तर इतरांची काय व्यथा असेल, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अशोक विखे-पाटील यांनी येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

डॉ. अशोक विखे-पाटील म्हणाले की…

१.  ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांच्यावर उपचार करण्यात राधाकृष्ण विखे-पाटील, शालिनी विखे-पाटील आणि डॉ. सुजय विखे-पाटील यांनी हेळसांड केली.

२. मोठा भाऊ म्हणून वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा माझा अधिकार होता; मात्र राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तो हिरावून घेतला.

३. वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या कह्यातील संस्था काढून घेतल्या. त्यासाठी न्यायालयात दिलेल्या वडिलांच्या स्वाक्षर्‍या खोट्या आहेत.

४. बाळासाहेब विखे-पाटील आणि शरद पवार यांचे वैर नव्हते; मात्र तरीही सध्याच्या राजकारणासाठी त्याचा गवगवा केला जात आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स संकेतस्थळ)


Multi Language |Offline reading | PDF