तिरुपती मंदिराचे १ सहस्र ४०० किलो सोने निवडणूक आयोगाने पकडले

आंध्रप्रदेश सरकारकडून चौकशीचा आदेश

तिरुपती (आंध्रप्रदेश) – १८ एप्रिल या दिवशी तमिळनाडूतील तिरूवल्लूर येथे निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांकडून एक वाहन अडवण्यात आले होते. त्यामध्ये १ सहस्र ३८१ किलो सोने सापडले होते. हे सोने तिरूमला तिरूपती देवस्थानम्चे (टीटीडीचे) असून ते पंजाब नॅशनल बँकेतून तिरूपती येथे नेण्यात येत असल्याचे वाहनातील लोकांनी सांगितले होते. यावरून वाद झाल्याने आंद्रप्रदेश राज्याचे मुख्य सचिव एल्.व्ही. सुब्रह्मण्यम् यांनी विशेष मुख्य सचिव (महसूल) मनमोहन सिंह यांना मंदिराचे सोने नेण्याच्या वेळी झालेली सुरक्षेतील आणि प्रक्रियेतील चूक यांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. यावर २३ एप्रिलपर्यंत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. या चुकीमुळेच निवडणूक आयोगाने हे सोने पकडले.

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now