‘चौकीदार चोर आहे’ या विधानाच्या प्रकरणात राहुल गांधी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात खेद व्यक्त

प्रथम न्यायालयाचा अवमान करायचा आणि नंतर खेद व्यक्त करून मोकळे व्हायचे ! असा चुकीचा पायंडा पडू नये, यासाठी न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावणे अपेक्षित आहे !

नवी देहली – राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर आहे’, असे सर्वोच्च न्यायालयही म्हणते’, अशा प्रकारचे विधान केले होते. त्यावरून त्यांच्या विरोधात भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट केली होती. त्यावरून ‘आमच्या निर्णयात ‘चौकीदार चोर आहे’, असे कुठेही म्हटलेले नाही’, असे सांगत न्यायालयाने राहुल गांधी यांना स्पष्टीकरण देण्याची नोटीस बजावली होती. त्यावर उत्तर देतांना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यायालयात खेद व्यक्त केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, निवडणुकीच्या वातावरणात मी आवेशात विधान केले होते आणि विरोधकांनी माझ्या विधानाचा विपर्यास करत अपसमज पसरवले. ‘राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाने ‘चौकीदार चोर आहे’, असे विधान केल्याचे विरोधकांनी पसरवले होते. मी असा विचार कधी केलाही नव्हता.


Multi Language |Offline reading | PDF