‘गुरु ऑर गूगल (गुरु कि गूगल) ?’ या विषयावरील ‘इंग्लिश एक्स्टेम्परी’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारा चेन्नई येथील कु. हिम्नीष !

कु. हिम्नीष

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्यापासून कु. हिम्नीष याने नामजपास आरंभ करणे आणि एका मासातच त्याच्यात पालट जाणवणे : ‘आमचा मुलगा कु. हिम्नीष अकरावीत शिकत आहे. त्याने अलीकडेच त्याच्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘गुरु ऑर गूगल (गुरु कि गूगल ?)’ या विषयावरील ‘इंग्लिश एक्स्टेम्परी (एखाद्या विषयाची पूर्वसिद्धता न करता ऐनवेळी त्यावर बोलणे)’ स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आमच्या कुटुंबावर केलेली ही कृपाच आहे. एक मासापूर्वी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आमच्या घरी आल्या असतांना त्यांनी हिम्नीषला नामजप करण्यास सांगितले होते. तेव्हापासून (म्हणजे एका मासापासून) तो नियमितपणे नामजप करत आहे. नामजप करू लागल्यापासून त्याच्यात झालेले पालट आम्हाला जाणवत आहेत. आता तो अधिक समजूतदार आणि शांत झाला आहे.

– श्री. बालाजी आणि सौ. कल्पना (कु. हिम्नीष याचे आई-वडील), चेन्नई, तमिळनाडू. (२८.२.२०१९)

स्पर्धेमध्ये ‘गुरु कि गूगल ?’ या विषयावर बोलतांना कु. हिम्नीष याने मांडलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अ. पूर्वीच्या काळी आतासारखी आधुनिक शिक्षणपद्धत नव्हती. त्यामुळे लोक गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण घेत असत. भगवान रामसुद्धा शिक्षण घेण्यासाठी गुरुकुलात गेला होता.

आ. मानवाने निर्माण केलेल्या ‘गूगल’ या ‘सर्च इंजिन’वर आपल्याला प्रत्येक विषयावरील माहिती क्षणार्धात मिळते. असे असले, तरी ‘त्यातील कोणती माहिती चांगली आहे आणि कोणती वाईट आहे ?’, याचे वर्गीकरण करणे कठीण आहे; मात्र गुरुकुलमध्ये गुरु शिष्यांना जीवनातील केवळ चांगल्या गोष्टीच शिकवत असत.

इ. ‘गूगल’चे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) श्री. सुंदर पिचई यांचेही पूर्वी गुरु होते. (हेसुद्धा एके काळी त्यांच्या गुरूंचे शिष्यच होते.)

ई. अशा प्रकारे शिष्याच्या जीवनामध्ये गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.’


Multi Language |Offline reading | PDF