निवडणूक आयोगाची आचारसंहिता भंग करणार्‍यावर कारवाई होणार !

मतदान केंद्रात भ्रमणभाष नेण्यास मनाई

सातारा, २२ एप्रिल (वार्ता.) – मतदारांनी मतदान करायला जातांना भ्रमणभाष सोबत घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रात भ्रमणभाष नेण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची आचारसंहिता भंग करणार्‍यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी २१ एप्रिलला दिली.

श्‍वेता सिंघल पुढे म्हणाल्या की, २३ एप्रिल या दिवशी सकाळी ७ ते सायं ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन जावे. मतदान ओळखपत्र नसल्यास मतदाराने पासपोर्ट, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे पासबूक, पॅनकार्ड, आधारकार्ड  यांपैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर सादर करता येणार असून अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्र. १९५० (टोल फ्री) वर संपर्क साधावा.


Multi Language |Offline reading | PDF