वाचकांत राष्ट्रप्रेम जागवणारे, त्यांना धर्मसंजीवनी देणारे अन् अध्यात्ममार्ग अनुसरणार्‍यांंना दिशादर्शन करणारे सर्वांगस्पर्शी ‘सनातन प्रभात’ घरोघरी पोचवा !

(सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ

१. एकांड्या शिलेदाराप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वैशिष्ट्ये !

‘सनातन प्रभात’ हे केवळ नियतकालिक नव्हे, तर धर्माचा ‘राखणदार’, धर्मशिक्षण देणारा ‘धर्मगुरु’, समाजसुधारणा करणारा ‘लोकनायक’ आणि राष्ट्ररक्षणासाठी शब्दांचे शस्त्र धारण केलेला ‘क्रांतीकारक’ आहे !

१ अ. ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ यांचा अनोखा संगम ! : ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ हे सनातन प्रभातच्या शिकवणीचे सार आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे. ब्राह्मतेजामुळे हिंदु समाज नीतीमान, धर्मनिष्ठ आणि आत्मबलसंपन्न होईल, तर क्षात्रतेजामुळे हिंदूंवरील अन्याय आणि राष्ट्राला अधोगतीकडे नेणारी व्यवस्था यांविरुद्ध लढण्याचे बळ मिळेल.                                      (क्रमश:)

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘सनातन प्रभातचे अनेक वाचक आपले नातेवाईक, स्नेही आणि परिचित यांना या नियतकालिकाचे महत्त्व सांगून वाचक होण्यास प्रवृत्त करत आहेत. वाचकांनी सनातन प्रभातचे नवीन वाचक बनवण्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न केले असल्यास अथवा या नियतकालिकाचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण योजना किंवा संकल्पना सुचत असल्यास त्याविषयी [email protected] या संगणकीय पत्त्यावर कळवावे.

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.४.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now