साधिकेला टिकलीऐवजी कुंकू लावण्याचे लक्षात आलेले महत्त्व

सौ. शकुंतला बद्दी

कपाळावर कुंकू लावल्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन नामजपामुळे निर्माण होणारी ऊर्जा आज्ञाचक्रातून शरीरभर पसरून संपूर्ण शरीर चैतन्याने भारीत झाल्याचे जाणवणे आणि मनातील निरर्थक विचारही न्यून होणे : ‘साधनेत आल्यापासून ‘टिकली न लावता कुंकू लावण्याचे महत्त्व’ कळूनही प्रत्यक्षात माझ्याकडून तशी कृती होत नव्हती. २.९.२०१८ पासून मी ‘कुंकूच लावायचे’, असे निश्‍चित करून गोल आकारात कपाळावर कुंकू लावले. त्या क्षणापासून मला पुष्कळ आनंद वाटू लागला. मी डोळे मिटून शांतपणे नामजप करत असतांना माझ्या आज्ञाचक्रातून नामजपामुळे निर्माण होणारी ऊर्जा शरीरभर पसरून संपूर्ण शरीर चैतन्याने भारीत झाल्याची स्पष्ट जाणीव होत होती. जपही भावपूर्ण होऊन निरर्थक विचार न्यून होऊन सत्चे विचार येत होते. टिकली लावल्यावर तोंडवळ्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आल्यासारखे वाटायचे. कुंकू लावल्यावर आवरण नष्ट होऊन तोंडवळा तेजस्वी बनला. सहसाधिकांनाही हा भेद जाणवला.

‘देवा, ही कृती करण्यासाठी मला पुष्कळ उशिरा सुचून त्यातून मिळणार्‍या चैतन्यमयी आनंदापासून मी इतके दिवस वंचित राहिले, यासाठी या निर्बुद्ध लेकराला क्षमा कर. तू सांगितलेली प्रत्येक कृती तूच या जिवाकडून करवून घे’, हीच तुझ्या कोमल चरणी प्रार्थना.’

– सौ. शकुंतला बद्दी, खारघर, नवी मुंबई. (६.९.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF