सेवेची गती पुष्कळ असली, तरीही साधकाचे मन स्थिर आणि अंतर्मुख होऊन सेवेत गुंतलेले असणे अन् त्याला सर्वत्र देवाचेच अस्तित्व जाणवणे

‘सनातनच्या देवद येथील आश्रमात काही दिवस वास्तव्याला असतांना ध्यानमंदिरात स्वच्छतेची सेवा करत होतो. सहसाधकाने मला सांगितले, ‘‘३.३० वाजता साधक नामजपाला येणार आहेत. त्याआधी स्वच्छता पूर्ण झाली पाहिजे.’’ त्यामुळे सेवा करतांना माझी गती पुष्कळ होती; पण त्या वेळी माझे मन इतके स्थिर आणि अंतर्मुख होऊन सेवेत गुंतले होते की, मला वेळेचे भानच नव्हते. ‘मी कुठल्यातरी अशा लोकामध्ये होतो की, जिथे लोकांना काही काळ-वेळ लागतच नाही’, असे मला वाटत होते. थोडक्यात मी काळाच्याही पलीकडे गेलो होतो. प्रत्येक वस्तू उचलतांना हळूवारपणे उचलत होतो, जणू ती वस्तू मला सांगत होती, ‘सांभाळ ! यातही देव आहे. भूमीवर जेथे पाय ठेवतो, तेथेही देव आहे.’ सेवा पूर्ण झाल्यावरही माझ्या मनाची स्थिती ४ घंटे तशीच होती. ही अनुभूती दिल्यामुळे मी गुरुदेवांच्या प्रती कोटी कोटी वेळा कृतज्ञ आहे.’ – श्री. विष्णु गजरे, कल्याण, ठाणे. (२१.१.२०१७)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF