रामनाथी येथील आश्रमात झालेल्या हनुमानकवच यागाच्या वेळी सनातनच्या साधिका श्रीमती अंजली कुलकर्णी यांना त्यांच्या गोव्यातील ढवळी येथील घरी आलेल्या अनुभूती

श्रीमती अंजली कुलकर्णी

१. रामनाथी येथील आश्रमात झालेल्या पंचमुखी हनुमानकवच यज्ञाच्या वेळी श्री अनंतानंद साईश यांना कोणीतरी हाताला धरून आणलेले दिसणे

‘२२.३.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात पंचमुखी हनुमानकवच याग झाला. तेव्हा ‘दुपारी ११.३० ते ११.४५ या वेळेत कोणीतरी श्री अनंतानंद साईश यांना हाताला धरून यागापाशी आणले आहे’, असे मला दिसले. ‘श्री अनंतानंद साईश यागाच्या ठिकाणी काही वेळ थांबले’, असेही जाणवले.

२. महाबली हनुमानाचे प्रथम वायुरूपात आगमन होणे आणि नंतर प्रत्यक्ष रूप दिसणे

आश्रमातील धार्मिक विधी केलेल्या कोपर्‍यातील बाजूने एकदम वायुदेवता आली. यागाच्या ठिकाणी परडीमध्ये पिवळ्या चाफ्याची फुले ठेवलेली होती. वायुदेवतेच्या वेगाने येण्यामुळे फुलांच्या पाकळ्या पुष्कळ जोरात हलू लागल्या. यागाच्या ठिकाणापासून चारही बाजूंनी एक ते दीड फूट उंचीच्या अंतरावर जमिनीपासून वर चैतन्य पसरू लागले होते. ते एका ठराविक अंतरापर्यंत पसरलेले दिसले. त्यानंतर ‘श्रीविष्णु कपाळावर उभेे गंध लावतात, तसे केशरी रंगाचे गंध लावलेला हनुमान आल्याचे दिसले. त्याने अंगावर पिवळ्या रंगाचा शेला (उत्तरीय) घेतला होता. उजव्या हातात दिवा घेऊन तो आरती करत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा ‘श्‍वासासमवेत शरिरात चैतन्य जात आहे’, असे वाटत होते.’

– श्रीमती अंजली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF