चीन भारतासमवेत अनौपचारिक बैठकीसाठी सिद्ध

भारताने ज्याप्रमाणे ‘आतंकवाद संपवत नाही, तोपर्यंत पाकशी चर्चा करणार नाही’, अशी भूमिका घेतली आहे, त्याप्रमाणेच ‘चीनने मसूद अझहर आणि अन्य आतंकवाद्यांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याची भूमिका घेतल्याविना चर्चा होणार नाही’, असे ठणकावून सांगितले पाहिजे !

बीजिंग – चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाला भारताने विरोध करू नये. जम्मू-काश्मीरच्या भारताच्या मूलभूत भूमिकेच्या आड येण्याचा चीनचा प्रश्‍नच येत नाही, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, ‘बीआर्आय’ (बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटीव्ह)विषयी भारताशी मतभेद असले तरी संबंध सुधारण्यासाठी भारतासमवेत वुहान येथे झालेल्या बैठकीसारखी एखादी बैठक घेण्यास चीन सिद्ध आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये वुहान नंतरची दुसरी अनौपचारिक बैठक भारतातील निवडणुका संपल्यानंतर भारतात होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF