(म्हणे) ‘संसदेच्या दोन्ही सदनांत बहुमत मिळाल्यावर कलम ३७० रहित करणार !’ – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

शहा यांनी भाजपच्या ‘संकल्प पत्रा’त असा उल्लेख का केला नाही ? भाजपने आतापर्यंत हिंदूंना या सूत्रांवरून मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आहे ! भाजपला राज्यसभेत बहुमत मिळण्याची शक्यता पुढील काही वर्षांत तरी दिसत नाही. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेवर आला, तरी तो राज्यसभेत बहुमत नसल्याचे कारण सांगून राममंदिरासह हिंदुत्वाचे कोणतेही आश्‍वासन पूर्ण करणार नाही, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे !

वलसाड (गुजरात) – संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांत भाजपला बहुमत मिळाल्यावर काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित करणार, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथील सभेत सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF