शांत, समजूतदार आणि पुढाकार घेऊन कृती करण्याची आवड असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. नंदिता दिवेकर (वय ११ वर्षे) !

कु. नंदिता दिवेकर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !

  • शांत, समजूतदार आणि पुढाकार घेऊन कृती करण्याची आवड असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पेण, रायगड येथील कु. नंदिता दिवेकर (वय ११ वर्षे) !
  • उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. नंदिता दिवेकर एक आहे !

(कु. नंदिताची आध्यात्मिक पातळी वर्ष २०१३ मध्ये ४७ टक्के आणि वर्ष २०१६ मध्ये ५१ टक्के होती. – संकलक)

चैत्र कृष्ण पक्ष तृतीया, म्हणजेच २२.४.२०१९ या दिवशी कु. नंदिताचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कु. नंदिता दिवेकर

१. शांत आणि समजूतदार

अ. ‘पूर्वी शाळेत काही साहित्य मागितल्यास ते आणेपर्यंत नंदिता पुष्कळ हट्ट करायची; परंतु आता ती समंजसपणे कृती करते.

आ. आम्ही कुठे बाहेर गेलो, तरी ती ‘मला अमुक वस्तू हवी’, यासाठी कधीच हट्ट करत नाही. त्यामुळे सर्वच जण तिचे पुष्कळ कौतुक करतात.

इ. एकदा तिची लहान बहीण चि. वेदश्री (वय ५ वर्षे) एका वस्तूसाठी हट्ट करत होती. तेव्हा नंदिताने तिला शांतपणे समजावून सांगितले. ई. एकदा चि. वेदश्रीचा अभ्यास पूर्ण करून घेण्यास मी विसरले. हे लक्षात आल्यावर नंदिता म्हणाली, ‘‘आई, मी तिचा अभ्यास घेते.’’

२. वक्तशीरपणा

ती वेळेचे पालन काटेकोरपणे करते. ती शाळेतही वेळेतच जाते. १ मिनिट विलंब झालेला तिला चालत नाही.

३. लहान मुलांशी प्रेमाने खेळणे

नंदिताला लहान मुले पुष्कळ आवडतात. त्यांना ती आवडीने आणि प्रेमाने खेळवते. आम्ही कधी कधी गावाला जातो. तेव्हा तेथील लहान मुले लगेचच नंदिताशी खेळायला येतात.

४. प्रेमभाव

मी कधी आजारी पडले, तर ती माझी प्रेमाने सेवा करते. मला प्रत्येक वस्तू आणून देते, तसेच बहिणीलाही आनंदाने सांभाळते.

५. नियोजनबद्धता

ती स्वतःच्या अभ्यासाचे नियोजन योग्य पद्धतीने करते. त्यामुळे तिला परीक्षेत चांगले गुण मिळतात. चि. वेदश्रीच्या परीक्षेच्या कालावधीत नंदिता तिला प्रश्‍नपत्रिका सिद्ध करून देते आणि ती सोडवण्यास सांगते. हे सर्व ती स्वतःचा अभ्यास सांभाळून करते.

६. पुढाकार घेणे

शाळेत एखादा कार्यक्रम, स्पर्धा असेल, तर ती त्यात भाग घेते. ‘पुढाकार घेतल्यामुळे देव साहाय्य करतो’, अशी तिची श्रद्धा आहे.

७. सात्त्विक गोष्टींची आवड

आमच्या घरी गणेशोत्सवाच्या काळात पूजेची पूर्वसिद्धता ती मनापासून करते. देवाची भांडी घासणे, फुले आणणे, धूप करणे, आरती करणे, तसेच हार बनवणे, अशा सर्वच कृती ती पुष्कळ आवडीने करते. यासाठी तिला काही सांगावे लागत नाही. तिला रांगोळी काढायला आवडते. शाळेतही ती रांगोळी स्पर्धेत भाग घेते.

८. साधनेची आवड

८ अ. प्रार्थना आणि कृतज्ञता यांचे गांभीर्य : ती प्रत्येक वेळी प्रार्थना करूनच अभ्यासाला प्रारंभ करते. कधी कृतज्ञता व्यक्त करण्यास विसरल्यास परात्पर गुरुदेवांच्या चरणी कान पकडून क्षमायाचना करते.

८ आ. सेवेत साहाय्य करणे : ती माझ्या समवेत सेवेला येते. घरी काही सेवा आणल्यास ती मला आनंदाने साहाय्य करते.

८ इ. आश्रमात सेवेला जाण्याची सिद्धता दर्शवणे : ‘पूर्वीच्या तुलनेत तिची आश्रमात सेवेला जाण्याची ओढ वाढली आहे’, असे जाणवते. पूर्वी ‘आश्रमात जाऊया’, असे म्हटल्यावर ती काहीच प्रतिसाद द्यायची नाही. आता ती आश्रमात जाण्याची सिद्धता दर्शवते.

९. स्वभावदोष आणि अयोग्य कृती

सांगितलेले न ऐकणे, आळशीपणा, स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम पुष्कळ वेळ पहाणे

– सौ. दीपाली दिवेकर (कु. नंदिताची आई), पेण, रायगड. (१२.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF