हिंदु धर्म, देव आणि संत यांचा अवमान करणार्‍या नेत्यांना हिंदूंनी निवडणुकीत मतांच्या माध्यमातून धडा शिकवावा ! – ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – देशामध्ये अन्य धर्मियांच्या मतांसाठी सर्वच पक्षांतील काही तथाकथित निधर्मी नेते हिंदु धर्म, देव, संत, तसेच हिंदु धर्मातील प्रथा आणि परंपरा यांचा अवमान अन् टिंगलटवाळी करतात. हिंदू संघटित नसून याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या नेत्यांचे असे करण्याचे धाडस होत आहे. तरी सर्व हिंदूंंनी पक्ष, संघटना बाजूला ठेवून धर्मविध्वंसक नेत्यांना मतांच्या माध्यमातून निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार तसेच आध्यात्मिक संस्था यांना केले आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंच्या देवतांना आम्ही कवडीची किंमत देत नाही, तर हिंदूंना काय देणार, हा या टीकेमागील हेतू असून हिंदूंना गुलाम बनवण्याचा हा सरावच आहे. हे सर्व आताच नाही, तर पुरातन काळापासून चालू आहे. असे असूनही श्रद्धा आणि भक्ती यांच्या जोरावर, तसेच शौर्य अन् पराक्रम यांच्या बळावर सनातन वैदिक हिंदु धर्म जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राला हिंदु धर्माचा अवमान होऊ देणे शोभत नाही. यासाठीही धर्मविध्वंसक नेत्यांना मतांच्या माध्यमातून धडा शिकवायला हवा.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now