(म्हणे) ‘उद्योगांसाठी आणि शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी सरकार पालटा !’ – शरद पवार

सातारा, २१ एप्रिल (वार्ता.) – गेल्या ५ वर्षांत प्रचंड बेरोजगारी वाढली; मात्र कारखानदारी वाढली नाही. तसेच गेल्या ५ वर्षांत या सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतलेले नाहीत. परिणामी ११ सहस्र ९९८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. (स्वत:च्या शासनकाळात झालेल्या सहस्रो शेतकर्‍यांच्या आत्महत्यांविषयी शरद पवार मात्र बोलत नाहीत ! – संपादक) विद्यमान सरकारने शेतीमालाच्या किंमती जाणीवपूर्वक वाढवल्या आहेत. यामुळे शेतीउत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. शेतकर्‍याला सन्मानाने जगता आले पाहिजे. यामुळे उद्योगांसाठी आणि शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी सरकार पालटा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येथील जिल्हा परिषद मैदानावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत ते बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF